Advertisement

मुंबईत 'इतके' दिवस १० टक्के पाणीकपात


मुंबईत 'इतके' दिवस १० टक्के पाणीकपात
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या ३ ते ९ डिसेंबर या काळात संपुर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. पालिकेच्या पिसे उदंचन केंद्रामध्ये ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या दुरूस्तीच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा चांगला पाऊस पडल्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे.

तलावांमधील जलसाठा जास्त असला तरी पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांत अनेकदा पाणीकपात करावी लागली आहे. यावेळी ही पाणीकपात आठवडाभर राहणार असल्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईसह नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

एलटीटी-डबलडेकर एक्स्प्रेला ७ अतिरिक्त डबे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा