SHARE

दरवर्षी थंडीचा आनंद लुटण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांची प्रचंड मागणी असल्यानं मध्य रेल्वेतर्फे कोकण मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. यंदाही डिसेंबर महिना, नाताळची सुट्टी आणि थर्टी फर्स्ट या काळात कोकणात जाणाऱ्यांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनं एलटीटी-डबलडेकर एक्स्प्रेसला ७ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

७ अतिरिक्त डबे 

या अतिरिक्त डब्यांचे आरक्षण आज, सोमवार २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून ११०८५-११०८६ लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसला ७ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. अतिरिक्त डब्यात ३ टायर वातानुकूलित डब्याचे ५ डबे आणि २ टायर वातानुकूलितचे २ डबे यांचा समावेश आहे. अतिरिक्त डब्यांच्या जोडणीनंतर पहिली डबलडेकर एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी एलटीटीहून मार्गस्थ होणार आहे. तसंच, या गाडीचा परतीचा प्रवास १० डिसेंबरला सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

प्रवाशांना दिलासा

डिसेंबर महिन्यात अनेक जण थर्टी फर्स्टचे प्लॅन आखत असतात. एकीकडे वाढणारी प्रतीक्षा यादी आणि दुसरीकडे कोकणातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं प्रवासी त्रस्त होतात. मात्र, या अतिरिक्त डब्यांमुळं व या डब्यांच्या आरक्षण प्रक्रियेमुळं प्रवाशांची चिंता काही अंशी मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा -

मुंबईकरांना थंडीचा प्रतिक्षा कायम

काँग्रेसचे नाना पटोले बनले विधानसभा अध्यक्षसंबंधित विषय
ताज्या बातम्या