Advertisement

मुंबईसह नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

मुंबईसह नवीमुंबई परिसरातील हेवेची गुणवत्ता रविवारी खूपचं खालावली होती.

मुंबईसह नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली
SHARES

मुंबईसह नवीमुंबई परिसरातील हेवेची गुणवत्ता रविवारी खूपचं खालावली होती. वाऱ्याचा घटलेल्या वेगामुळं हवेत तरंगणाऱ्या सुक्ष्मकणांचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळं मुंबईतील अनेक भागांमध्ये हवा धुरकट झाली होती. या वातावरणामुळं हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी या हवेत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हवेची गुणवत्ता वाईट

‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅड व्हेदर फोरकास्ट अ‍ॅड रिसर्च’ (सफर) संस्थेनं केलेल्या नोंदीनुसार माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी पूर्व, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळं अतिसूक्ष्म धुलीकण वातावरणाच्या वरच्या भागांत तरंगत राहत आहेत.


धुलीकण तरंगत

दुपारी वाऱ्याचा वेग काहीसा वाढतो त्यामुळं दुपारी हे धुलीकण उडून जातात. परंतु, सकाळी आणि संध्याकाळी, रात्री वारा कमी झाल्यामुळं धुलीकण तरंगत राहिलं होतं. त्याचबरोबर वातावरणही ढगाळ होतं. त्यामुळं हवेची गुणवत्ता खालावली होती.



हेही वाचा -

एलटीटी-डबलडेकर एक्स्प्रेला ७ अतिरिक्त डबे

मुंबईकरांना थंडीचा प्रतिक्षा कायम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा