Advertisement

पीआयबी करणार व्हॉट्सअपवरील सरकारी माहितीची शहानिशा

व्हॉट्सअपवर असंख्य प्रकारची माहिती येत असते. त्यातील कुठली माहिती खरी, याची वापरकर्त्यांना कल्पना नसते.

पीआयबी करणार व्हॉट्सअपवरील सरकारी माहितीची शहानिशा
SHARES

मुंबईसह जगातील प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती सहज सोशल मीडियावर उपलब्ध होते. त्याचप्रमाणं, सध्या व्हॉट्सअपवर सक्रिय असल्यामुळं इथं प्रत्येकी विषयावर चर्चा करण्यात येते. तसंच, काही गोष्टींची माहितीही पाठविली जाते. त्यामुळं सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती खरी असे याची शाश्वती नसते. यासाठीच सरकारची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या 'प्रेस इन्फर्मेशन ब्युरो'नं (पीआयबी) पुढाकार घेतला आहे. पीआयबी आता अशा माहितीची शहानिशा करुन देणार आहे.

असंख्य प्रकारची माहिती

व्हॉट्सअपवर असंख्य प्रकारची माहिती येत असते. त्यातील कुठली माहिती खरी, याची वापरकर्त्यांना कल्पना नसते. माहिती खरी की खोटी, यांचा विचार न करताच अनेकजण ती पुढे फॉरवर्ड करतात. यामध्ये राजकीय पक्ष, राजकीय नेते, सरकारी निर्णय, सरकारी योजनांसह सर्वच प्रकारच्या पोस्टचा समावेश असतो. यापैकी सरकारी योजनांच्या पोस्ट खऱ्या की खोट्या, हे आता पीआयबी तपासणार आहे.

पोस्टची शहानिशा

तुमच्या व्हॉट्सअप सरकारी योजनेसंबंधी एखादी पोस्ट आली असल्यास ती खरी आहे की खोटी, हे तपासायचे असल्यास +९१-८७९९७११२५९ या क्रमांकावर ती पोस्ट फॉरवर्ड करावी. किंवा pibfactcheck@gmail.com यावर मेलदेखील पाठवावी. त्यानंतर, पीआयबीकडून संबंधित पोस्टची सरकारी विभागांकडून शहानिशा केली जाणार आहे. त्यानुसार, पोस्ट पाठवणाऱ्याला कळवलं जाणार आहे. परंतु, यावर फक्त केंद्र सरकारचे विविध विभाग, मंत्रालये व योजना यासंबधीच्याच पोस्टचा तपास केला जाणार आहे. कुठल्याही राजकीय किंवा खासगी कंपनीच्या पोस्टची शहानिशा केली जाणार नाही, असंही पीआयबीने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा -

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांची होणार डीएनए चाचणी, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा