• मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल दाखल
  • मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल दाखल
SHARE

नव्या वर्षात ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली आहे. तसंच, ही लोकल ट्रान्स हार्बरवर चालविण्याचं नियोजन आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेची पहिली एसी लोकलचं सारथ्य महिला मोटरमनच्या हाती देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल चालवणं अशक्य

लोकलची अधिक उंची आणि कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान असलेल्या उड्डाणपुलांच्या कमी उंचीमुळं मध्य रेल्वेवर एसी लोकल चालवणं अशक्य झालं होतं. मात्र, या तांत्रिक अडचणी सोडवण्यात मध्य रेल्वेला यश आलं आहे. त्यानुसार, एसी लोकल ट्रान्स हार्बर मर्गावर चालविण्यात येणार असून, ही लोकल मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

प्रवासी संघटनांसोबत बैठक

एसी लोकलसाठी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. काही चाचण्यानंतर जानेवारी २०२० पर्यंत ती धावण्याची शक्यता आहे. परंतु, लोकल चालवण्याच्या नियोजना संदर्भात त्याआधी प्रवासी संघटनांसोबत एक बैठक घेतल्यानंतर दुसरी बैठकही २ दिवसांत होणार आहे. त्यामध्ये संघटनांची मते विचारात घेऊन लोकलच्या मार्गावर ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

१०० कर्मचारी सेवेत

मध्य रेल्वेवर येणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या सेवेसाठी १०० कर्मचारी असणार आहेत. लोकल सेवेत आल्यानंतर त्यातील बिघाड तात्काळ दुरुस्त कसा करावा, त्याची देखभाल-दुरुस्ती कशी करावी इत्यादींचं प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचं माहिती मिळते. चेन्नईतील रेल्वे कारखान्यात बनवलेल्या या लोकल गाडीसाठी ५० कोटींचा खर्च आला आहे.

सर्व डब्यांत सीसीटी

सध्या लोकलमध्ये सीसीटीव्ही नसून लवकरच सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवणार आहेत. एकूण ६ लोकल ताफ्यात दाखल करण्याचं नियोजन आहे. पहिली लोकल दाखल झाली असून, ती महिनाभरात सेवेत आणली जाणार आहे. तसंच, दुसरी वातानुकूलित लोकलही मार्च २०२० पर्यंत येईल. उर्वरित ४ लोकल डिसेंबर २०२० पर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत. याआधी वातानुकूलित लोकलच्या उंचीचा मुद्दा होता. पण येणाऱ्या सर्व लोकलची उंची कमी करण्यात आली असून, त्यामुळं हार्बर, ट्रान्स हार्बरबरोबरच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, खोपोली मार्गावरही लोकल धावणं शक्य आहे.हेही वाचा -

मेट्रो-३: आंध्र प्रदेशात बांधणार ८ डब्यांच्या ३१ मेट्रो

मुंबईच्या पाण्यात आढळले 'वांद्रा' व 'कुर्ला' व्हायरससंबंधित विषय
ताज्या बातम्या