Advertisement

मुंबईच्या पाण्यात आढळले 'वांद्रा' व 'कुर्ला' व्हायरस

मुंबईतील विविध जलाशयांमध्ये एक मोठा विषाणू आढळून आला आहे.

मुंबईच्या पाण्यात आढळले 'वांद्रा' व 'कुर्ला' व्हायरस
SHARES

पावसाळा सुरू झाला की 'पाणी उकळून प्या', असं आवाहन वारंवार महापालिकेकडून मुंबईकरांना केलं जातं. तसंच, अनेकदा मुंबईतील पाण्यावरून महापालिका आणि मुंबईकरांमध्ये वाद झाले आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वीच महापालिकेनं मुंबईतील पाणी शुद्ध असल्याचा दावा केला होता. मात्र, तरीही मुंबईतील विविध जलाशयांमध्ये एक मोठा विषाणू आढळून आला आहे.

पाण्याची पाहणी

या विषाणूला शास्त्रज्ञांनी 'वांद्रे मेगाव्हायरस’, 'कुर्ला व्हायरस' अशी नावं दिली आहेत. हे विषाणू इतर विषाणूंपेक्षा खूप जास्त वेगानं मोठे होत आहेत. परंतु या विषाणूंचा फार धोका नसल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. देशात जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागानं निधी उपलब्ध करून आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील यांच्या चमूनं याबाबत संशोधन केलं. या संशोधनाअंतर्गत त्यांनी मुंबईतील विविध जलाशयांमधील पाण्याची पाहणी केली.

डीएनएची माहिती कॉपी

तब्बल ५ वर्षे केलेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांना विषाणूंबाबत माहिती मिळाली आहे. त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंची वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रा व्हायरस, कुर्ला व्हायरस, पवई लेक व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे ही नावे आहेत. हे व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातात. त्यावेळी ते शरीरातून डीएनएची माहिती कॉपी करतात आणि त्या डीएनएचे दुसऱ्याच्या शरीरात वहन करतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

महाकाय विषाणू

हे संशोधन नुकतंच 'सायन्टिफिक रीपोर्ट्स' या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे. शहरातील सांडपाणी, डेअरी युनिटचा जल उपचार प्रकल्प, घरगुती जल शुद्धीकरणापूर्वीचं पाण्याचे नमुने त्यांनी तपासले. त्याच्यावर अभ्यास केला असता त्यामधून त्यांनी हे महाकाय विषाणू शोधून काढले. यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले.



हेही वाचा -

भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

'पब्जी'ला मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा