'पब्जी'ला मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान

देशभरात पब्जी या गेमवर बंदी घातली जावी, अशा मागण्या केल्या जात आहेत. मात्र यंदा आयआयटी ‘टेकफेस्ट’मध्ये ‘पब्जी’चा समावेश करण्यात आला आहे.

SHARE

पब्जी’ या ऑनलाइन गेमचे व्यसन आणि त्याच्या दुष्परिणांची चर्चा वारंवार होत असते. पब्जी या गेमचा तरूण वर्गावर झालेला परिणाम हा खोलवर आहे. याची अनेक प्रकरणं समोर देखील आली आहेत. प्रमाणाबाहेर पब्जी खेळल्यानं कुणाच्या मनावर परिणाम झाला. तर कुणी पब्जीसाठी आपलं आयुष्य संपवलं. तरीही तरूण वर्गानं या खेळाला आपलेसं करत त्यात असाधारण कौशल्य मिळवली आहेत. या आडवाटेच्या कौशल्याला यंदा मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान मिळालं आहे

कधी आहे टेकफेस्ट?

देशभरात पब्जी या गेमवर बंदी घातली जावी, अशा मागण्या केल्या जात आहेत. मात्र ‘गेमाडपंथी’ तरुणाई यात अधिकाधिक प्रावीण्य मिळवत असून त्यातील कौशल्ये हेरत यंदा आयआयटी ‘टेकफेस्ट’मध्ये ‘पब्जी’चा समावेश करण्यात आला आहे. मुंबई आयआयटीमध्ये ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत ‘टेकफेस्ट’ होणार आहे.

गेमर्स लीग

गेल्या काही वर्षांपासून टेकफेस्टमध्ये ऑनलाइन खेळांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या ‘गेमर्स लीग’मध्ये लोकप्रिय ‘पब्जी’बरोबरच गेल्या काही वर्षांपासून ‘सीएस गो’ खेळणाऱ्यांचा सामना यंदाही रंगणार आहे. या दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. ‘पब्जी’ खेळणारे कुणीही संघ यात सहभागी होऊ शकतील. सुरुवातीला ‘पब्जी’साठी नोंदणी करणाऱ्या संघांचं आपापसात सामने होतील आणि त्यातील सर्वोत्तम १६ संघांचे ‘टेकफेस्ट’मध्ये सामने होतील.

कधीपर्यंत कराल नोंदणी

पब्जी’च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १४ डिसेंबपर्यंत नोंदणी करता येणार आहे. निवड सामन्यांचे वेळापत्रक १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून १७ डिसेंबरपासून सामने सुरू होणार आहेत. निवड झालेल्या १६ संघांचे सामने ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत ‘टेकफेस्ट’ दरम्यान होणार आहेत.हेही वाचा

आता महिन्याभरात मिळतील पदवी प्रमाणपत्रं

१० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार

संबंधित विषय
ताज्या बातम्या