Advertisement

१० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार


१० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार
SHARES

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत नापास झाल्यास गुणपत्रिकेवर 'नापास' असा शेरा देण्यात येतो. मात्र, आता गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शेरा हटवून त्याऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागानं जारी केला आहे.

अनुतिर्ण शेरा

गुणपत्रिकेवर अनुतिर्ण शेरा देण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव विभागाकडून राज्य शिक्षण मंडळाकडं पाठविण्यात आला आहे.१०वी, १२वी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागानं घेतला आहे.


कौशल्य विकास

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. त्यानुसार, आता १०वी व १२वी परीक्षेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असं नमूद करण्यात येणार आहे.


शासन निर्णय

यापूर्वी शिक्षण विभागानं २७ सप्टेंबर २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून १०वी परीक्षेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असं नमूद केलं आहे. यानंतर दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर एटीकेटी असा शेरा येत होता.


विद्यार्थ्यांना दिलासा

शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर कौशल्य विकास व उद्योजकता विभागानंही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावी व बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्याची योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

MHT-CETचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबईवर गुरुवारी पावसाचं सावट?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा