Advertisement

मुंबईवर गुरुवारी पावसाचं सावट?

फक्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक या भागांमध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

मुंबईवर गुरुवारी पावसाचं सावट?
SHARES

महाराष्ट्रातून पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीय. डिसेंबर महिन्यात थंडीची चाहुल लागते. पण थंडीचा ठावठिकाणा नसताना  हवामान खात्याकडून चक्क पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत गुरुवारी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक या भागांमध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे

या कारणामुळे पडणार पाऊस

अरबी समुद्रामध्ये एकदा एकाच वेळी २ चक्रीवादळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांची नावं आहेत. येत्या २४ तासांत ही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईत पाऊस पडू शकतो. त्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.

डबल ट्रबल

क्यार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. अरबी समुद्रात या आधी ४ तर बंगालच्या उपसागरात ३ चक्रीवादळांची यावर्षी निर्मिती झाली होती. त्यातच अरबी समुद्रात आणखी २ चक्रीवादळे निर्माण होत आहेत.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा