MHT-CETचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

एमएचटी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

SHARE

एमएचटी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षानं (सीईटी सेल) परीक्षांचं वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. यामध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तसंच, एमबीएची सीईटी १४ आणि १५ मार्च रोजी होणार आहे. एलएलबी तृतीय वर्ष २८ जून आणि एलएलबी ५ वर्ष १२ एप्रिल रोजी होणार आहेत.

संभाव्य वेळापत्रक

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

सीईटी वेळापत्रक

मेडिकल अभ्यासक्रमांच्या संदर्भातील सीईटी वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ३ व ५ वर्षीय विधी (लॉ), बीई / बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बी/बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत.

अशा होणार परीक्षा

परीक्षा 
कालावधी
एमएचटी सीईटी 
१३ ते २३ एप्रिल
एमबीए/एमएमएस 
१४ आणि १५ मार्च
एमसीए 
२८ मार्च
मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 
१६ मे
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 
१० मे
एलएलबी 
५ वर्षे १२ एप्रिल
एलएलबी 
३ वर्षे २८ जून
बीपीएड 
११ मे
बीएड/एमएड 
१२ मे
एमपीएड 
१४ मे
बीए/बीएससी बीएड 
२० मे
एमएड 
२६ मेहेही वाचा -

मुंबईवर गुरुवारी पावसाचं सावट?

पंकजा, रोहिणींना जाणीवपूर्वक पाडलं, एकनाथ खडसेंचा मोठा आरोपसंबंधित विषय
ताज्या बातम्या