Advertisement

२०१९ मध्ये भारतीयांनी गुगलवर 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

​​गुगलने २०१९ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे.

२०१९ मध्ये भारतीयांनी गुगलवर 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च
SHARES

सरत्या २०१९ या वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्यामुळे हे वर्ष भारतीयांच्या कायम लक्षात राहणारं आहे.  क्रिकेट विश्वचषक, लोकसभा निवडणूक, लवामा हल्ला आणि त्यानंतरचा एअर स्ट्राइक, चांद्रयान-२ मोहिम, कलम ३७० अशा महत्त्वपूर्ण घटनांचे २०१९ हे वर्ष साक्षीदार आहे.  मात्र, या सर्वांमध्ये इंटरनेटवर भारतीयांनी क्रिकेटला सर्वात जास्त पसंती दिली आहे. २०१९ मध्ये भारतीयांनी गुगलवर क्रिकेट वर्ल्ड कप हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. 

गुगलने २०१९ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये Cricket World Cup हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. गुगलच्या ओव्हरऑल कॅटॅगरीमध्ये या सर्चला पहिले स्थान मिळाले आहे. लोकसभा निवडणूक हा शब्द सर्वाधिक सर्च करण्यात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. याशिवाय चांद्रयान-२, आर्टिकल ३७० याबाबतही मोठ्या प्रमाणात सर्च केलं गेलं आहे.

सर्वाधिक सर्च झालेल्या बाबी

1) क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup)
2) लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Elections)
3) चांद्रयान-2 ( Chandrayaan 2)
4) कबीर सिंग (Kabir Singh)
5) अॅव्हेंजर्स एण्डगेम ( Avengers: Endgame)
6) आर्टिकल 370 ( Article 370)
7) नीट एक्झॅम ( NEET results)
8) जोकर ( Joker)
9) कॅप्टन मार्व्हल ( Captain Marvel )
10) पीएम किसान योजना ( PM Kisan Yojana)
 



हेही वाचा  -

'या' आयफोन आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

पीआयबी करणार व्हॉट्सअपवरील सरकारी माहितीची शहानिशा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा