अंतराळात कसे आवाज येतात माहितीये? नासाचे हे रेकॉर्डिंग्ज ऐका!

मुंबईसारख्या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये हल्ली हॅलोविन पार्टीची मोठी क्रेझ सुरु झाली आहे. दरवर्षीच्या 31 ऑक्टोबरला ही हॅलोविन पार्टी सेलिब्रेट केली जाते. आपल्या अवती-भवती असणाऱ्या सर्व नकारात्मक बाबी घालवण्यासाठी ही हॅलोविन पार्टी सेलिब्रेट केली जाते असं सांगितलं जातं. या पार्ट्यांमध्ये सर्वजण भूतांसारखा पोषााख आणि मास्क लावून एन्जॉय करतात. मुंबईत विविध ठिकाणी अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं.

नासाचे हॅलोविन स्पेशल साऊंड ट्रॅक!

पण यंदा मुंबईकरांसोबतच नासाही (National Aeronautics and Space Administration) हॅलोविन पार्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. आणि त्यासाठी त्यांनी खास साऊंडट्रॅक लाँच केले आहेत. आता पार्टी म्हटलं, की धम्माल डीजे साऊंड ट्रॅकची कल्पना तुम्ही केली असाल. पण नासाने लाँच केलेले हे साऊंड ट्रॅक मात्र भलतेच आहेत!

अंतराळ संशोधनासाठी नासाकडून अनेकदा मोहिमा काढल्या जातात. आत्तापर्यंत नासाने संशोधनासाठी अनेक अवकाशवाऱ्या केल्या आहेत. आपल्या सूर्यमालेतल्या अनेक ग्रहांना नासाने सोडलेल्या यानांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि अनुभवलं आहे. आणि त्यातूनच जन्माला आलेले काही साऊण्ड ट्रॅक्स नासाने लाँच केलेले आहेत. तेही खास हॅलोविन पार्टीसाठी!

ग्रहांभोवती भ्रमंती करताना रेकॉर्ड केलेले आवाज!

या ग्रहांभोवती भ्रमंती करताना नासाच्या यानांनी अनेक प्रकारचे आवाज रेकॉर्ड केले आहेत. वेगवेगळ्या ग्रहांवरच्या सजीव अथवा निर्जीव सृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने हे आवाज रेकॉर्ड केले आहेत. हे आवाज जरी त्या त्या ग्रहावरच्या सजीव अथवा निर्जीव सृष्टीविषयी, तिथल्या वातावरणाविषयी संशोधन करण्यासाठी नासाला उपयोगी ठरत असले, तरी सामान्य माणसाला हे आवाज भूताटकीचे वाटल्याखेरीज राहणार नाहीत. आणि त्यासाठीच नासाने त्यातलेच काही गंमतीशीर आणि तितकेच भयानक आवाजांचं एक पॅकेजच लाँच केलं आहे.

गुरू ग्रह (Jupitor) - नासाच्या जुनो स्पेसक्राफ्टने गुरु ग्रहाच्या चुंबकीय कक्षेत (Magnetic Field) प्रवेश करताना निर्माण झालेला आवाज 24 जून 2016 रोजी रेकॉर्ड केला.

https://www.nasa.gov/feature/jpl/nasas-juno-spacecraft-enters-jupiters-magnetic-field

प्लाझ्मा लहरी - नासाच्या व्हॅन अॅलेन स्पेसक्राफ्टने अंतराळात भ्रमण करताना रेकॉर्ड केलेला प्लाझ्मा लहरींचा आवाज. एखाद्या समुद्राच्या पृष्ठभागावर लहरींमुळे निर्माण होणाऱ्या आवाजासारखा आवाज.

https://www.nasa.gov/feature/goddard/2017/nasa-listens-in-as-electrons-whistle-while-they-work

शनी ग्रह (Saturn) - नासाच्या कॅसिनी स्पेसक्राफ्टने शनि ग्रहाभोवती भ्रमण करताना तिथल्या रेडिओ लहरींचा हा आवाज. आपल्या सूर्यमालेत सर्वाधिक प्रखर रेडिओ लहरी या शनि ग्रहावर निर्माण होतात.

https://www.nasa.gov/mission_pages/cassini/multimedia/pia07966.html

गुरू ग्रहाचा चंद्र (Jupitor's Moon) - आपल्या पृथ्वीला जसा चंद्र हा उपग्रह आहे, तसाच गुरू अर्थात ज्युपिटर या ग्रहाचाही गॅनिमेड (Ganymede) नावाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. 27 जून 1996 रोजी नासाचं गॅलिलिओ स्पेसक्राफ्टने पहिल्यांदाच गॅनिमेडच्या कक्षेत प्रवेश केला. यावेळी गॅनिमेडने सोडलेल्या रेडिओ लहरींचं आवाजाच केलेलं हे रूपांतर. वैज्ञानिक भाषेत याला 'डाटा सोनिफिकेशन' (Data Sonification) असं म्हणतात.

https://solarsystem.nasa.gov/galileo/sounds.cfm

धुमकेतू - नासाचं स्टारडस्ट स्पेसक्राफ्ट अंतराळातून प्रवास करताना त्यावर अंतराळातले काही धुळीचे कण आणि छोटे दगड आदळले. यावेळी निर्माण झालेला आवाज या स्पेसक्राफ्टने रेकॉर्ड केला आहे.

https://www.jpl.nasa.gov/video/details.php?id=970

याव्यतिरिक्तही नासाने अनेक प्रकारचे आवाज रेकॉर्ड केले आहेत. साऊंड क्लाऊडच्या खालील लिंकवर हे इतर आवाज ऐकता येतील.

https://soundcloud.com/nasa/sets/spookyspacesounds


हेही वाचा

13 कोटी वर्षांपूर्वी अंतराळात घडलेला 'गोल्ड रश'!

पुढील बातमी
इतर बातम्या