ऑर्कुट आठवतंय का? ते परत येतंय!

फेसबुक आणि ट्वीटर वापरता वापरता ऑर्कुट नावाचं काहीतरी होतं, ज्यानं मागच्या दशकात तरूणाईला वेड लावलं होतं, हेही आपण विसरून गेलो आहोत. पण त्याची आठवण पुन्हा करून देण्यासाठी ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या जगात एन्ट्री मारण्यासाठी सज्ज झालंय. फेसबुक आणि ट्वीटरसारख्या अॅपना टक्कर द्यायला पुन्हा एकदा ते नव्या रूपात येणार आहे. येत्या दोन महिन्यात ऑर्कुट भारतात सुरू होणार आहे. पण या वेळी त्याचं नाव ऑर्कुट नाही तर हॅलो असणार आहे!

'हॅलो' का?

हॅलो ही नवीन वेबसाईट लोकांना एकमेकांशी कनेक्ट करायला मदत करेल. आपण एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी हॅलो या शब्दाचा वापर करतो. त्यामुळेच या साईटचं नाव हॅलो ठेवण्यात आलं आहे, असं ४२ वर्षीय ऑर्कुट बयुकोकटेननं म्हटलं आहे. शिवाय ऑर्कुटप्रमाणे हॅलो देखील सोशल मीडियामध्ये आपलं स्थान निर्माण करेल, असा विश्वास देखील बयुकोकटेन यानं व्यक्त केला.

एकेकाळी ऑर्कुट या वेबसाईटची प्रचंड क्रेझ होती. जवळपास ३०० कोटी युझर्स ऑर्कुट वापरायचे. पण फेसबुकनं सोशल मीडियात पाऊल ठेवताच ऑर्कुटची क्रेझ कमी होत गेली. फेसबुकचे सध्या २०० कोटींहून अधिक अॅक्टिव्ह युझर्स आहेत. हळूहळू युझर्सनी ऑर्कुटकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऑर्कुट बंद करण्यात आलं.


हेही वाचा

सावधान! तुमच्याही मोबाईलचा होऊ शकतो स्फोट!

पुढील बातमी
इतर बातम्या