Advertisement

सावधान! तुमच्याही मोबाईलचा होऊ शकतो स्फोट!

काय आहेत मोबाईलचा स्फोट होण्याआधीची लक्षणं? मोबाईलच्या बॅटरीची कशी काळजी घ्याल? हे वाचा.

सावधान! तुमच्याही मोबाईलचा होऊ शकतो स्फोट!
SHARES

पेपरमध्ये आपण अनेकदा वाचतो की, मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन कुणी जखमी झालं, तर कुणाचा कान फुटला, कुणी भाजलं. अनेकदा सोशल मीडियावर बॅटरी फुटल्यानं कुणीनाकुणी जखमी झाल्याचे फोटो व्हायरल होत असतात. पण आपण वेळीच काळजी घेतली, तर अशा घटनांना आवर घालता येऊ शकतो. काय आहेत मोबाईलचा स्फोट होण्याआधीची लक्षणं? मोबाईलच्या बॅटरीची कशी काळजी घ्याल? हे वाचा.



बॅटरी फुटण्याआधीची लक्षणं

१) जर तुमच्या फोनची बॅटरी वारंवार गरम होत असेल, तर बॅटरी ताबतोब बदला. कारण गरम होणारी बॅटरी फुटण्याची शक्यता अधिक असते

२) जर तुमची बॅटरी फुगली असेल, तर ती फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी बॅटरी बदलण्याची आवश्यक्ता आहे

३) स्मार्टफोन फेकल्यामुळे सुद्धा बॅटरीचा स्फोट होऊ शकतो

४) कमी तापमानाच्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग केला, तर बॅटरी फुटण्याची दाट शक्यता असते. कारण लिथियम आयर्नपासून बनलेल्या या बॅटरी थंड वातावरणात लवकर गरम होतात

५) मोबाईलची बॅटरी मर्यादेपेक्षा अधिक चार्ज केली, तर ती फुटण्याची शक्यता असते. बॅटरी जास्त चार्ज केल्यानं जास्त दिवस चालते हा समज चुकीचा आहे. उलट मोबाईल फोनची बॅटरी खराब होते

६) चार्जिंग करताना फोनचा वापर करू नये. त्यामुळे फोनच्या मदरबोर्डवर ताण येतो. याचाच परिणाम की अनेकवेळा चार्जिंग करताना मोबाईलचा वापर केल्यानं स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत

७) अनधिकृत विक्रेत्यांकडून, दुकानदाराकडून मोबाईल फोन किंवा मोबाईल बॅटरी घेऊ नका. हल्ली मोबाईल फोन कंपन्या मोबाईल युजर्स गाईडमध्ये बॅटरीचे कोडनंबर देतात. त्या कोडनंबरनुसार बॅटरी घ्या. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही

८) आकाशात विजा चमकत असताना, पेट्रोल पंपाजवळ मोबाईल फोनचा वापर टाळावा. अन्यथा मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते.

९) ज्या कंपनीचा मोबाईल आहे, त्याच कंपनीचा चार्जर वापरा. डूप्लिकेट चार्जर वापरू नका

१൦) मोबाईल चार्जिंग करताना गरम जागेवर ठेवू नका. उदाहरणार्थ गॅस जवळ, इलेक्ट्रॉनिक वस्तूंजवळ मोबाईल ठेवू नये. त्यामुळे ओव्हर हिटींग होऊन मोबाईल फुटू शकतो


बॅटरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स



१) फ्लाईट मोडचा वापर करा

मोबाईल फोन सातत्यानं नेटवर्कला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. नेटवर्क नसेल अशा ठिकाणी फोन फ्लाईट मोडवर ठेवावा. अशा वेळी बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.

२) ब्राइटनेस सेट करा

स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे स्क्रीनचा ब्राईटनेस कमी केल्यास बॅटरी जास्त काळ चार्ज राहते. ऑटो ब्राइटनेस ऑप्शन निवडावा. सोईनुसार तुमच्या स्क्रीनचा ब्राईटनेस सेट करता येतो.

३) पुश नोटिफिकेशन टर्न ऑफ करावं

अकाऊंट्स आपोआप सिंक्रोनाईझ करण्याऐवजी मॅन्युअली करावं. त्यामुळे बॅटरी आणि डाटा युजेसही कमी होतो.

४) लोकेशन सर्व्हिसेसला मिनिमाईझ करा

लोकेशन दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन आणि जीपीएससारख्या सेवा बॅटरीचा जास्त वापर करतात. त्यांना मिनिमाईझ करून ठेवावं किंवा गरज असेल तेव्हाच अशा अॅप्लिकेशनचा वापर करावा.



हेही वाचा

अासुसचा पेगासुस 4 एस भारतात लॉन्च


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा