Advertisement

अासुसचा पेगासुस 4 एस भारतात लॉन्च


अासुसचा पेगासुस 4 एस भारतात लॉन्च
SHARES

संगणक बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आसुस या कंपनीने पेगासुस 4 एस हा नवीन फोन भारतात लॉन्च केला आहे. मागील काही वर्षांत अासुस कंपनीने आपला दबदबा भारतीय बाजारपेठेत कायम ठेवला आहे. संगणक बनवणाऱ्या या कंपनीने आता हळूहळू मोबाईलच्या बाजारापेठेत आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. Asus Pegasus 4S चे वैशिष्ट्ये म्हणजे या फोनची बॉडी ही मेटलची आहे. यामुळे लूक सोबतच मोबाईला मजबुतीही मिळेल.


काय आहे या फोनची खासियत?

  • डुएल कॅमेरा सेटअप
  • 4030 एमएएचची बैटरी
  • 720x1440 पिक्सल स्क्रीन रिजॉल्युशन
  • मोबाईलचे वजन 160 ग्राम
  • 8 मेगापिक्सल सेंसर कॅमेरा
  • अँड्रॉईड 7.0 नूगा
  • 4जी व्हीओएलटीई
  • ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी 6750 टी प्रोसेसर
  • 3 जीबी रॅम+32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज
  • 5.7 इंच एचडी डिस्पले
  • हा मोबाईल दोन कलर्स मध्ये उपलब्ध


सुरुवातीला चमकदार काळा आणि सोनेरी या दोन रंगात हा मोबाईल उपलब्ध असेल. लवकरच हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा