गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये वेगाने आपलं स्थान निर्मण केलेल्या शाओमी मोबाईल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपली नवी Redmi Y सीरीज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Y1 आणि Redmi Y Lite या दोन नव्या स्मार्टफोनचा समावेश आहे. अवघ्या 8,999 रूपयांपासून या स्मार्टफोनच्या किंमती सुरु होतात. Redmi Y1 ही सीरीज खास अॅडव्हान्स्ड सेल्फी टेक्नोलॉजी वापरून बनवण्यात आली आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन ही पहिली चॉईस ठरू शकतो!
Redmi Y सीरीजमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी असलेला शाओमीचा स्मार्टफोन 8,999 रूपयांमध्ये असेल. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी असलेला Redmi Y सीरीजचा शाओमी स्मार्टफोन 10,999 रूपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi Y Lite सीरीजच्या शाओमी स्मार्टफोनची किंमत 6,999 असेल. याव्यतिरिक्त MIUI 9 हे स्मार्टफोन मॉडेलही कंपनीने लाँच केलं आहे.
शाओमी स्मार्टफोनच्या याआधीच्या सीरीजप्रमाणेच या सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन हे ऑनलाईनच खरेदी करता येणार आहेत. येत्या 8 नोव्हेंबरपासून ही ऑनलाईन विक्री सुरु केली जाईल असं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. amazon.com आणि mi.com या वेबसाईट्सवर हे मोबाईल खरेदीसाठी उपलब्ध असतील.
| फीचर्स | Redmi Y1 | Redmi Y Lite | 
|---|---|---|
| फ्रंट कॅमेरा | 16 मेगापिक्सल | - | 
| रेअर कॅमेरा | 13 मेगापिक्सल | 13 मेगापिक्सल | 
| डिस्प्ले | 5.5 इंच एचडी | 5.5 इंच एचडी | 
| प्रोसेसर | क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 | क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 | 
| रॅम | 3जीबी/4जीबी | 2 जीबी | 
| मेमरी | 32जीबी/64जीबी | 16जीबी | 
शाओमीचा MIUI 9 हा स्मार्टफोन आधीच्या MIUI8 पेक्षा अधिक फास्ट असेल. तसेच, नोटिफिकेशन्स, स्प्टिल स्क्रिन, अॅनिमेटेड आयकॉन्स या बाबतीत MIUI 9 अधिक अॅडव्हान्स असेल. तसेच, MIUI 9मध्ये मोबाईल फोटो एडिटिंगसाठी अतिरिक्त स्टिकर्सही उपलब्ध असतील असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा