Advertisement

आयफोन 7 मिळणार 7,777 रूपयांमध्ये!

आयफोन 7 ची खरी किंमत ही 47,777 रूपये आहे. मग तो 7777 रूपयांमध्ये कसा मिळू शकेल?

आयफोन 7 मिळणार 7,777 रूपयांमध्ये!
SHARES

बातमीचं शीर्षक अर्थात हेडर वाचून तुम्हीही चक्रावला असाल. कारण मुळात आयफोन 7 ची खरी किंमत ही 47,777 रूपये आहे. मग तो 7777 रूपयांमध्ये कसा मिळू शकेल?


कसा मिळेल 7777मध्ये आयफोन 7?

भारती एअरटेलने ही स्कीम आणली आहे. याअंतर्गत ग्राहकांना 7777 रूपयांचं डाऊन पेमेंट भरून आयफोन 7 घेता येणार आहे. आणि उर्वरीत रक्कम ही ईएमआयच्या स्वरूपात द्यावी लागेल. यामध्ये पुढचे 24 महिने तुम्हाला 2499 रूपयांचा इएमआय प्रत्येक महिन्याला चुकवावा लागेल. पण हा फक्त इएमआय नसून तुम्हाला या पैशांमध्ये एअरटेलचे वेगवेगळे प्लॅन्स मिळणार आहेत.


काय मिळेल तुमच्या पैशांमध्ये?

2499 रूपयांच्या इएमआयमध्ये तुम्हाला 30 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. मात्र यामध्ये तुम्हाला जर मध्येच एअरटेलचं सिमकार्ड बदलायचं असेल, तर उरलेली रक्कम एअरटेलला जमा करावी लागणार आहे.


का घडतंय हे सगळं?

गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल सेक्टरमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या सर्व्हिस अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सच्या जीओ सर्व्हिसनंतर मोबाईल विश्वात ग्राहकांना परवडतील किंवा अत्यंत कमी किंमतीत मिळतील अशा सुविधा देण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे.

भविष्यात याचे काय परिणाम होतील? ग्राहक या कंपन्यांवर किती अवलंबून रहातील? या कंपन्या अशाच प्रकारे स्वस्त दरामध्ये कधीपर्यंत सेवा पुरवू शकतील? याविषयी जाणकारांमध्ये संभ्रम आहे. तसाच तो ग्राहकांमध्येही आहे. मात्र सध्या तरी बाजारात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांचा फायदा होत आहे हे मात्र नक्की!



हेही वाचा

पृथ्वीचं आर्मागेडन झालं तर?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा