आता स्पृहा म्हणणार नाही, 'डोन्ट वरी बी हॅपी'!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • नाटक

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर आपली वेगळी छाप पाडली. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हीट ठरली. अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलिंगचं काम करत होतं.

उमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे. आजच्या पिढीतील नवरा बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. कारण, स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळाला आहे. मात्र हा चेहरा नेमका कोणाचा असेल? हे सध्या गुपित ठेवण्यात आलं आहे.

'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार आहे. याविषयी स्वतः स्पृहा जोशी हिने आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर माहिती दिली आहे. 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, काही इतर कमिटमेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंडपणे चालू राहील, असा मला विश्वास आहे'. 


हेही वाचा

मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

पुढील बातमी
इतर बातम्या