Advertisement

मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणूकीत 'आपलं पॅनल'ने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 'आपलं पॅनल'चे प्रसाद कांबळी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रसाद कांबळी यांच्या विरोधात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उभे होते.

मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी
SHARES

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणूकीत 'आपलं पॅनल'ने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 'आपलं पॅनल'चे प्रसाद कांबळी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रसाद कांबळी यांच्या विरोधात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उभे होते.

१० वाजल्यापासून मतमोजणी

नाट्य परिषेदेच्या निवडणुकीकडे सकाळपासूनच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. गुरूनाथ दळवी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितलं. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली.

आपलं पॅनलचे विजयी उमेदवार

अध्यक्ष- नवनाथ (प्रसाद) कांबळी
उपाध्यक्ष - (प्रशासन) - डॉ. गिरीश ओक
उपाध्यक्ष - (उपक्रम) - दरेकर
कोषाध्यक्ष - नाथा चितळे
कार्यवाह- शरद पोंक्षे

सहकार्यवाह
सुनिल ढगे
अशोक ढेरे
सतीश लोटके

सदस्य
मधुरा वेलणकर - साटम
शंकर रेगे
भरत जाधव
अविनाश नारकर
शेखर बेंद्रे
राजन भिसे
मंगेश कदम
संदीप जंगम
खरवस आनंद
उज्ज्वल देशमुख
गिरीश महाजन

आज बाबांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. याक्षणी बाबांची उणीव भासत आहे. माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मी. जी स्वप्न, ध्येय घेऊन या निवडणूकीच्या रिंगणात उतरलो, ती पूर्ण करायची आहेत.

नवनाथ (प्रसाद) कांबळी, अध्यक्ष

प्रसादचं कौतुक आहेच. पण यामागे सगळ्यांची मेहनत आहे. या टीममध्ये असणारा प्रत्येक जण हा नाटकातला आहे. जिंकण्याचा आनंद आहेच. पण या पुढे खूप काम करायचं आहे.

भरत जाधव, सहकार्यवाहकहेही वाचा

रंगभूमीवर पुन्हा होणार 'वस्त्रहरण'

संबंधित विषय
Advertisement