• रंगभूमीवर पुन्हा होणार 'वस्त्रहरण'
  • रंगभूमीवर पुन्हा होणार 'वस्त्रहरण'
SHARE

मराठी नाट्यसृष्टीत सर्वात गाजलेलं आणि लोकप्रिय नाटक म्हणजे वस्त्रहरण. मालवणी भाषा असणाऱ्या या नाटकानं इतिहास घडवला. या नाटाकाने, त्याच्या भाषेनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. याच नाटकाची मजा आता तुम्हाला परत घेता येणार आहे. 


तात्या सरपंचांची भूमिकेत कोण?

मराठी नाट्यसृष्टीतलं सर्वात लोकप्रिय नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात मच्छिंद्र कांबळी यांनी साकारलेल्या तात्या सरपंचांची भूमिका आता दिगंबर नाईक साकारणार आहेत.

या नाटकात दिगंबर नाईक यांच्याबरोबर कोणकोणते कलाकार असतील याबबात गुप्तता पाळण्यात आली आहे. या आधीही दिगंबर नाईक यांनी तात्या सरपंचांची भूमिका साकारली होती.


प्रेक्षक उत्सुक

गेल्या ३८ वर्षात अनेक कलाकारांनी या नाटकात भूमिका सादर केल्या. २०१२ मध्ये सेलिब्रिटी वस्त्रहरणाचे खास ३१ प्रयोग सादर करण्यात आले होते. आजवर या नाटकाचे शेकडो प्रयोग सादर झाले आहेत. आता वस्त्रहरण पुन्हा येत आहे म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या