मध्य रेल्वेवर 7 महिन्यांत १൦൦ कोटींचा दंड वसूल!

वारंवार आवाहन करुनही रेल्वेतून फुकटचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दंडात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात एक मोहिमच राबवली आहे. ज्यात विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून एप्रिल ते ऑक्टोबर २൦१७ या कालावधीत १൦൦ कोटी ६७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर २൦१७ मध्ये एवढ्या गुन्ह्यांची नोंद

मध्य रेल्वेवर ऑक्टोबर २०१७ मध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात ३.३९ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १७ कोटी ६६ लाखाचा दंड वसूल केला आहे.

तर, गेल्या वर्षी २०१६ च्या ऑक्टोबर महिन्यात २.८८ लाख केसेस दाखल झाल्या असून १४ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, यावर्षी २१.७३ टक्क्यांनी रकमेत वाढ झाली आहे.

तसंच, एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या सात महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात १९ लाख ८२ हजार गुन्ह्यांची नोंद केली असून १०० कोटी ६७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

गेल्या वर्षी या सात महिन्यांमध्ये १६ लाख ३७ हजार गुन्ह्यांची नोंद होती. यामधून ८० कोटी २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पण, या दंडाच्या रकमेत यावर्षी २५.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वेच्या फुकट्यांकडून चालू वर्षात 39 कोटींचा दंड वसूल

पुढील बातमी
इतर बातम्या