Advertisement

मध्य रेल्वेच्या फुकट्यांकडून चालू वर्षात 39 कोटींचा दंड वसूल


मध्य रेल्वेच्या फुकट्यांकडून चालू वर्षात 39 कोटींचा दंड वसूल
SHARES

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. या चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 एवढा दंड वसूल केला आहे. शिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने चालू वर्षात 8 लाख 23 हजार 806 गुन्ह्यांची नोंदही केली आहे.


गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यानचा आकडा

गेल्या वर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान मध्य रेल्वेने 6 लाख 77 हजार 677 एवढे गुन्हे नोंदवले होते. त्यातून 30 कोटी 84 लाख 27 हजार 22 दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या दंडात 21. 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, 28.89 टक्क्यांनी दंडात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं आहे.


2016-17 या वर्षांत इतक्या फुकट्यांवर कारवाई

मध्य रेल्वेने 2016-17 या वर्षांत फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल 128 कोटी 63 लाख दंडवसुलीतून जमा केले. यंदा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फुकट्यांना चाप बसवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. सकाळी गर्दीच्या वेळी संधीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून अशा प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

2015-16 या आर्थिक वर्षात 24 लाख 31 हजार प्रवाशांना रेल्वेने पकडले होते. यात 2016-17 मध्ये 128 कोटी 63 कोटींची दंडवसुली झाली असून, 2015-16 मध्ये 120 कोटी 57 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती.



हे देखील वाचा -

यंदा फुकट्यांकडून 'मरे'ची भरघोस वसूली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा