यंदा फुकट्यांकडून 'मरे'ची भरघोस वसूली

CST
यंदा फुकट्यांकडून 'मरे'ची भरघोस वसूली
यंदा फुकट्यांकडून 'मरे'ची भरघोस वसूली
See all
मुंबई  -  

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. मात्र याच लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. मध्य रेल्वेने 2016-17 या वर्षांत फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल 128 कोटी 63 लाख दंडवसुलीतून जमा केले आहेत. या आर्थिक वर्षात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फुकट्यांना चाप बसवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6.68 टक्क्यांची वाढ झाली आहे. कार्यालयीन वेळेत रेल्वेला जास्त गर्दी असते. अशावेळी संधीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. यंदा मात्र अशा प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

विनातिकीट मालडब्ब्यातून माल नेणाऱ्या तब्बल 26 लाख 88 हजार प्रवाशांना गेल्या आर्थिक वर्षात पकडण्यात आले. तर 2015-16 या आर्थिक वर्षात 24 लाख 31 हजार प्रवाशांना रेल्वेने पकडले होते. यात 2016-17 मध्ये 128 कोटी 63 कोटींची दंडवसुली झाली असून,2015-16 मध्ये 120 कोटी 57 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती. तिकीट,पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ‘मरे’तर्फे विविध कल्पना लढवून उपक्रम राबविले जातात. तरी फुकटे तिकिट न काढताच प्रवास करतात.

[हे पण वाचा - खिशात पैसे नसतील तर एटीएमद्वारे होणार दंड वसूल]

[हे पण वाचा - परेने फुकट्यांकडून केली दंडवसुली]

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.