Advertisement

परेने फुकट्यांकडून केली दंडवसुली


परेने फुकट्यांकडून केली दंडवसुली
SHARES

मुंबई - पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी 2017 मध्ये विनातिकीट प्रवास करणे, बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणे आदी प्रकरणात कारवाई करून एकूण 7 कोटी 36 लाखांचा दंड वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेने मार्च महिन्यात लांब पल्ल्याचे आरक्षित तिकीट बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केलेली 31 प्रकरणं उघडकीस आणली असून 984 गर्दुल्ले, अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून दंडात्मक कारवाई केली. तर 143 जणांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. 

पश्चिम रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने दलाल आणि असामाजिक तत्वांविरोधात सुमारे 202 तपासणी कारवाया करत 240 व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर रेल्वेच्या विविध कलमांतर्गत खटले चालवून दंड आकारला. आरपीएफच्या महिला सुरक्षा दलाने महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 12 वर्षांखालील 201 शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांना हुसकावून लावले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा