मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार २० नवीन लोकल

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहेकारण मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी रेल्वे मंडळानं अतिरिक्त २० बंबार्डिअर लोकल देण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी ७ लोकल मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत उर्वरित १३ लोकल डिसेंबरअखेर दाखल होणार आहेत. त्यामुळं रेल्वे प्रवाशांना डिसेंबरअखेर अधिक सुखकर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

प्रत्येकी १० लोकल 

बंबार्डिअर लोकलची बांधणी कोलकाता उपनगरीय रेल्वेसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोलकाता उपनगरीय रेल्वेची प्रकल्पपूर्ती झालेली नाही. त्यामुळं या लोकल मुंबईकडं रवाना करण्यात येणार आहेत. या लोकलमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी १० लोकल मिळणार असून या १२ डब्यांच्या लोकल असणार असल्याची माहिती समोर येते आहे.

बंबार्डिअर लोकल

मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १० नवीन बंबार्डिअर लोकलपैकी ७ लोकल दाखल झाल्या आहेत. उर्वरित ३ लोकल डिसेंबरअखेरीस दाखल होणार आहेत. त्याशिवाय बंबार्डिअर बांधणीच्या नव्या लोकल मध्य मार्गावर सुरू करून सीमेन्स बनावटीच्या लोकल हार्बर मार्गावर दाखल करण्यात येणार आहेत.

१२ डब्यांच्या लोकल

त्याशिवाय १२ डब्यांच्या नवीन बंबार्डिअर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफात दाखल झाल्यानंतर त्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. डिसेंबरअखेरपर्यंत या लोकल दाखल झाल्यानंतर महिनाभरात त्या १५ डब्यांमध्ये रूपांतरित करून अंधेरी-विरार मार्गावर चालवण्याचं नियोजन पश्चिम रेल्वेचं सुरू असल्याचं समजतं आहे.


हेही वाचा -

धनंजय मुंडेंची अटक टळली, गुन्हा दाखल करण्याला न्यायालयाची स्थगिती


पुढील बातमी
इतर बातम्या