प्रवाशांना दिलासा..मध्य रेल्वेवर बसवणार 318 एटीव्हीएम

तिकिटाच्या रांगेत बराच वेळ उभं राहून प्रवाशांना तिकीट काढावं लागतं. रांगेच्या या जाचातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम सेवा सुरू केली. पण प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे उपलब्ध एटीव्हीएम मशिन अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता मध्य रल्वेने एटीव्हीएम मशिनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेवरील स्थानकांवर 318 एटीव्हीएम मशिन बसवण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2018 मध्ये या सर्व मशिन स्थानकांवर बसवण्याचा रेल्वेचा मानस असल्याने त्यादृष्टीने निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे समजते आहे.

या स्थानकांवर बसवणार एटीव्हीएम मशिन

सीएसएमटी, मस्जिद, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी ते ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील सर्व स्थानकांवर.

तिकीट खिडक्यांसमोर असणाऱ्या रांगेत तासन् तास उभं राहून प्रवाशांना तिकीट उपलब्ध मिळतं. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ खर्च करावा लागतो. हा वेळ वाचण्यासाठी रेल्वेवरील स्थानकांवर एटीव्हीएम यंत्र बसवण्यात आले. तिकीट मिळवण्याचा सोपा मार्ग रेल्वेकडून उपलब्ध करण्यात आल्याने त्याचा वापर वाढू लागला. सध्याच्या घडीला 429 यंत्रे मध्य रेल्वेवरील लोकल स्थानकांवर आहेत. मात्र, या यंत्रांचा वापर अधिकाधिक वाढू लागल्याने यातील 62 यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शिवाय, मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बरवर 2010-11 मध्ये एकूण 38 लाख प्रवासी प्रवास करत होते. हीच संख्या सध्याच्या घडीला 40 लाख झाली आहे.

का वाढवणार मशिन?

मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावरील स्थानकांवर 22 टक्के तिकिटं ही एटीव्हीएम यंत्राद्वारेच काढली जातात. तर, एक रुपया जादा देऊन तिकीट सेवा घेणाऱ्या जेटीबीएसचा वाटा हा १५ टक्के, तर ६० टक्क्य़ांहून अधिक तिकिटे ही तिकीट खिडक्यांवर काढली जात असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे जेवढा वापर वाढला, तेवढा एटीव्हीएम यंत्र बिघडण्याचं प्रमाणही वाढत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी 318 नवीन यंत्रे बसवण्यात येणार आहेत. ही यंत्रे फेब्रुवारी 2018 पर्यंत टप्प्याटप्यात स्थानकांवर बसवली जातील.


हेही वाचा

'मरे'वर लागणार नवीन 110 एटीव्हीएम,'मुंबई लाइव्ह'चा दणका

पुढील बातमी
इतर बातम्या