'मरे'वर लागणार नवीन 110 एटीव्हीएम,'मुंबई लाइव्ह'चा दणका

 Mumbai
'मरे'वर लागणार नवीन 110 एटीव्हीएम,'मुंबई लाइव्ह'चा दणका
Mumbai  -  

मध्य रेल्वेच्या स्थानकांत 500 पेक्षा अधिक एटीव्हीएम मशिन्स आहेत. मात्र त्यातील अनेक मशिन बंद असल्याची बातमी 'मुंबई लाइव्ह'ने काही महिन्यांपूर्वी दिली होती. 'मुंबई लाइव्ह'ने दिलेल्या या बातमीची दखल अखेर रेल्वे प्रशासनाने घेतली असून, मध्य रेल्वेने नवीन कंपनीच्या 110 एटीव्हीएम मशिन्स घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. ज्या स्थानकावरील मशिन बंद पडल्या आहेत त्या काढून टाकून नवीन मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंग यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
मध्ये रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांचा तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचावा या हेतूने रेल्वे प्रशासनाने एटीएटीव्हीएमची सोय करून दिली खरी पण या मशिनच काही दिवसांनी बंद पडल्याने प्रवाशांवर पुन्हा खिडकीवर जाऊन तिकीट काढाण्याची वेळ आली. या मशिन्सचा रिअॅलिटी चेक करून  मुंबई लाइव्ह'ने मिशिन्सच काम करत नसल्याचे ढळढळीत वास्तव दोन महिन्यांपूर्वी समोर आणले होते.  


हेही वाचा - 

एटीव्हीएम मशीन फक्त नावालाच?


दरम्यान सीएसएमटी,कुर्ला,घाटकोपर,ठाणे,दिवा,डोंबिवली,कल्याण याचसोबत बदलापूर, अंबरनाथ, वडाळा, चेंबूर, वाशी या रेल्वे स्थानकांवर ही मशिन्स बसवण्यात येणार आहेत.

Loading Comments