तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना लागणारा वेळ वाचावा या हेतूने रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम आणि सीव्हीएम कूपन मशीनची सोय केली. या मशीन सुरू आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने रिअॅलिटी चेक केला. मात्र रेल्वे स्थानकातील बहुतेक स्टेशन्सवरील एटीव्हीएम मशीन बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागत आहे.
'परे' आणि 'मरे' स्थानकावर बसवण्यात आलेल्या मशीनची आकडेवारी पुढीलप्रमाणे -
स्थानकं | मशीन | चालू मशीन | बंद मशीन |
चर्चगेट | 4 | 4 | 0 |
मरीन लाईन्स | 3 | 1 | 2 |
चर्नीरोड | 5 | 1 | 4 |
ग्रँटरोड | 5 | 2 | 3 |
मुंबई सेंट्रल | 6 | 4 | 2 |
लोअर परेल | 2 | 1 | 1 |
एल्फिन्स्टन | 3 | 2 | 1 |
मस्जिद बंदर | 4 | 2 | 2 |
सॅण्डहर्स्ट रोड | 3 | 2 | 1 |
भायखळा | 5 | 3 | 2 |
चिंचपोकळी | 6 | 2 | 4 |
करी रोड | 3 | 0 | 3 |
परळ | 6 | 3 | 3 |
रेल्वे स्थानकातील समस्या आजही कायम आहेत. स्थानकातील बंद तिकीट खिडक्यांमुळे प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबलचक रांगा हे तर रोजचे चित्र आहे. या मशीन त्वरीत दुरुस्ती कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.