एसी लोकलच्या तिकीट विक्रीत वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे कामानिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना या उकाड्याचा तडाखा सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानामुळे लोकल प्रवाशांनी देखील साध्या लोकलऐवजी एसी लोकलकडे धाव घेतली आहे. परिणामी मागील १० दिवसांत एसी लोकलच्या तिकीट विक्रीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

किती झाली तिकीटविक्री?

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत ९२८३ तिकीटींची विक्री करण्यात आली होती. यामध्ये पश्चिम रेल्वेची ४९.२५ लाख रुपयांची कमाई झाली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात या तिकीट विक्रीच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या ऑक्टोबर महिन्याच्या १० दिवसांत १४,९४१ वर पोहोचली आहे. यावेळी पश्चिम रेल्वेला ६९.५१ लाख रुपयांची कमाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मुंबईतील तापमान सतत वाढत राहिले तर या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा-

नवं दादर हिरकणी बसस्थानक मंगळवारपासून सेवेत

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये 'फिरतं ग्रंथालय' सुरू

 

पुढील बातमी
इतर बातम्या