Advertisement

नवं दादर हिरकणी बसस्थानक मंगळवारपासून सेवेत


नवं दादर हिरकणी बसस्थानक मंगळवारपासून सेवेत
SHARES

दादर येथील एशियाड एसटी बस स्थानकाचा कायापालट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून करण्यात आला आहे. या जागेवर नव्यानं एसटी महामंडळानं नवीन बसस्थानकाची उभारणी केली असून हे या बसस्थानकाचं उद्घाटन बुधवारी १७ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र त्याचवेळी हे नवीन बसस्थानक आता एशियाड बसस्थानक म्हणून नव्हे तर हिरकणी बसस्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे हे विशेष.


१९८२ पासून एशियाड बस

१९८२ मध्ये नवी दिल्ली इथं भरलेल्या आशियाई खेळा (एशियाड गेम्स) मध्ये खेळाडूंना निवासस्थानापासून क्रीडांगणापर्यंत  ने-आण करण्यासाठी तत्कालीन संयोजकांनी एसटीच्या विशेष आरामदायी बसेस वापरल्या होत्या. या बसेस एसटी महामंडळाने आपल्या दापोडी (पुणे) येथील मध्यवर्ती कार्यशाळेत बनविल्या होत्या. एशियाड गेम्सनंतर या आरामदायी बसेस तत्कालीन महाव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार प्रथम दादर-पुणे स्टेशन या मार्गावर प्रवासी सेवेसाठी वापरण्यात आल्या. त्यावेळी मुंबई-पुणे दरम्यान टॅक्सी ट्युरींगची प्रचंड मक्तेदारी होती. परंतु दादर-पुणेदरम्यान सुरू झालेल्या या सेवेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अशा एशियाड बसेस मुंबईसह राज्यातील अनेक विभागांमध्ये सुरू करण्यात आल्या आणि त्याला एशियाड असंच नाव देण्यात आलं.


आरक्षणाची सुविधा 

दादर येथील बसस्थानकातून दादर-पुणे दरम्यान दिवसातून ७२ फेऱ्या एशियाड बसच्या होत्या. तर दरमहा तब्बल ६५ हजार प्रवाशांची ने-आण करतात. अशा या बसस्थानकांचं नव्यानं बांधकाम एसटीकडून करण्यात आलं आहे. अत्याधुनिक, आकर्षक असं बसस्थानक उभारण्यात आलं असून या बसस्थानकांमध्ये सर्व प्रकारच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 



हेही वाचा -  

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये 'फिरतं ग्रंथालय' सुरू

'परे'नंतर आता 'मरे'वर सुद्धा धावणार एसी लोकल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा