आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष गाडी

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • परिवहन

आषाढ महिना लागला की भक्तांना वेध लागतात ते विठ्ठल दर्शनाचे. पांडुरंगाच्या ओढीनं महाराष्ट्रभरातून अनेक वारकरी हजारो मैलाचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जातात. महिनाभर आधीच वारकरी दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. मात्र, ज्यांना पायी जाणं शक्य नाही अशांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन सुरु करण्यात आली अाहे. 

आरक्षण सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या दरम्यान ही ट्रेन धावणार आहे. १२ जुलै २०१८ पासून या गाडीचं आरक्षण सुरू झालं आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून आणि रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावरून या गाडीचं आरक्षण करता येईल.  या गाडीला १२ शयनायन आणि २ सामान्य श्रेणी डबे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज 

गाडी क्र.            -       ०११५१

कधी धावणार      -       २२ जुलै २०१८

वेळ                  -        मध्यरात्री १२.२० वाजता

कधी पोहचणार    -        २३ जुलैला दुपारी ४.०५ वाजता

मिरज ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 

गाडी क्र.            -       ०११५१

कधी धावणार      -       २३ जुलै २०१८

वेळ                  -        रात्री १०.५५ वाजता

कधी पोहचणार    -        २४ जुलैला दुपारी १२.२५ वाजता

थांबे                 -         दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौड, कुर्डुवाडी, पंढरपूर,

                                 सांगोला, ढालागाव


हेही वाचा -

एसटीची 'शयनयान' लवकरच प्रवाशांच्या सेवेत

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी


पुढील बातमी
इतर बातम्या