अस्वच्छ प्रसाधनगृहाची तक्रार अाता व्हाॅट्सअॅपवरुन

रेल्वे स्थानकांवरील प्रसाधनगृहात जाताना अनेकदा नाकाला रुमाल लावूनच जावं लागतं. तर अगदी पाच मिनिटंही त्या ठिकाणी उभं राहणं कठीण जातं. मात्र, नाईलाजास्तव त्या सुविधेचा वापर करावा लागतोच. मुंबईत अनेक रेल्वे स्थानकं आहेत ज्या ठिकाणी (पे अँड यूज) पैसे द्या आणि वापरा या तत्वावर प्रसाधनगृह चालवले जातात. आता अशा प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेकडे पश्चिम रेल्वेनं विशेष लक्ष दिलं आहे. या प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता आढळल्यास पश्चिम रेल्वेकडे व्हाॅट्सअॅपवरून तक्रार नोंदवता येणार आहे.

२४ तास सेवा

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या रेल्वे स्थानकादरम्यान कुठल्याही स्थानकावरील पैसे घेणारे प्रसाधनगृह ते अस्वच्छ आढळल्यास त्या ठिकाणचा फोटो काढून ९००४४९९७३३ या वॉटस्अॅप नंबरवर पाठवून तक्रार नोंदवता येणार अाहे. तसंच जर एखाद्या प्रसाधनगृहात जास्त पैसे आकारले जात असतील तर त्या संदर्भातील तक्रारही याच नंबरवरुन नोंदवता येणार आहे. ही सेवा २४ तास सुरु राहणार आहे.


हेही वाचा - 

म्हणून मध्य रेल्वेवरील लोकल धावतात उशिरा


पुढील बातमी
इतर बातम्या