Advertisement

म्हणून मध्य रेल्वेवरील लोकल धावतात उशिरा

हकाऱ्याला येण्यास उशीर होत असेल तर त्याचे मित्र फोन करून तो किती वेळात येईल याची माहिती घेतात. त्यानुसार चालू रेल्वेत आपत्कालीन साखळी खेचून जाणून बुजून रेल्वे थांबवतात. तोपर्यंत त्यांचा मित्र लोकलमध्ये पोहोचतो. अपवादात्मक गोष्टी आढळून न आल्यास मोटरमन पुन्हा १० ते १५ मिनिटांनी लोकल सुरू करतो. प्रवासी या सुविधेचा गैरवापर करत असल्याचं निदर्शनास येत आहे.

म्हणून मध्य रेल्वेवरील लोकल धावतात उशिरा
SHARES

चालत्या गाडीत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तातडीने गाडी थांबवण्यासाठी प्रत्येक डब्यात साखळीची सुविधा असते. पण केवळ आपत्कालीन परिस्थितीत नव्हे, तर विनाकारण साखळी खेचून गाडी थांबवल्याच्या ६६६ घटना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घडल्याने रेल्वेच्या वेळापत्रकाची एेशीतैशी झाली आहे.


साखळी खेचण्यामागची कारणं?

गेल्या ६ महिन्यांमध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विनाकारण साखळी ओढण्याच्या घटना ६६६ घडल्या. नियोजित स्थानकात उतरण्यास विसरल्याने, गाडीचा थांबा ठराविक ठिकाणी नसतानाही तिथंच उतरायचं असल्याने, गाडीत उंदीर शिरल्याने, तर कधी धावत्या रेल्वेतून निसर्गरम्य फोटो काढण्यासाठी अशा विविध कारणांसाठी साखळी ओढण्याच्या घटनांचे प्रमाण या ६६६ घटनांमध्ये जास्त आहे.



लोकल सुरू होण्यास वेळ

विनाकारण साखळी खेचल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा ३ वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. जानेवारी ते जून २०१८ या ६ महिन्यांत ६६६ घटनांमधील आरोपींकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०१७ मध्ये पहिल्या ६ महिन्यात या घटनांचं प्रमाण ५३० इतकं होतं. त्यामुळे या वर्षी अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येतं.


फक्त मित्रासाठी...

साखळी खेचल्यानंतर गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा अवधी लागतो. अनेकदा सहकार्याला येण्यास उशिर होत असेल तर त्याचे मित्र फोन करून तो किती वेळात येईल याची माहिती घेतात. त्यानुसार चालू रेल्वेत आपत्कालीन साखळी खेचून जाणून बुजून रेल्वे थांबवतात. तोपर्यंत त्यांचा मित्र लोकलमध्ये पोहोचतो. अपवादात्मक गोष्टी आढळून न आल्यास मोटरमन पुन्हा १० ते १५ मिनिटांनी लोकल सुरू करतो. प्रवासी या सुविधेचा गैरवापर करत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यासाठी सबळ कारण आहे का, याचा विचार प्रवाशांनी विचार करावा, असं आवाहन रेल्वेने केलं आहे.


 आकडेवारी

वर्ष
गुन्हे
२०१६
१९४७
२०१७
१३९३
२०१८
६६६ जूनपर्यंत




हेही वाचा-

महिलेचा जीव वाचवणाऱ्या कॉन्स्टेबलचा गौरव

एक्स्प्रेस उशीरा धावत असेल तर कळणार व्हॉट्सअॅपवर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा