Advertisement

एक्स्प्रेस उशीरा धावत असेल तर कळणार व्हॉट्सअॅपवर


एक्स्प्रेस उशीरा धावत असेल तर कळणार व्हॉट्सअॅपवर
SHARES

अनेकदा एक्स्प्रेस ट्रेनचं वेळापत्रक कोलमडतं. त्यामुळे आपण ज्या एक्स्प्रेसची वाट पाहत असतो ती कधी येणार याची माहितीच आपल्याला मिळत नाही. तासनतास स्टेशनवर वाट पाहत रहावं लागतं. पण आता तुमच्या या समस्येवर भारतीय रेल्वेनं एक उपाय काढला आहे. आता तुमची ट्रेन कुठं अडकली असेल किंवा उशीरा येणार असेल तर त्याचं लाइव्ह स्टेटस तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे.


रेल्वेची आयडियाची कल्पना

यापूर्वी एक्स्प्रेसचं लाइव्ह स्टेटस जाणून घेण्यासाठी एकतर चौकशी कक्षात फोन लावावा लागायचा. नाहीतर एखाद्या अॅपचा वापर करावा लागत होता किंवा इंटरनेटवरून पीएनआरच्या माध्यमातून माहिती घ्यावी लागत होती. पण आता प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेनं व्हॉट्सअॅप हे माध्यम निवडलं आहेआता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपचा वापर करून एक्स्प्रेसची माहिती मिळवता येणार आहेरेल्वेची मेकमायट्रिपसोबत भागीदारी

एक्स्प्रेस उशीर धावत आहे का? पुढील स्टेशन कोणतं? स्टेशनवर पोहोचायला किती वेळ लागेल? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत. रेल्वेनं मेक माय ट्रिपसोबत भागीदारी केली आहे. रेल्वे आणि मेक माय ट्रिप यांनी एकत्र येत एक व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला कुठल्या एक्स्प्रेसची माहिती असेल तर तुम्ही या ७३४९३८९१०४ नंबरवर व्हॉट्सअॅप करायासाठी तुम्हाला ट्रेनचा नंबर या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करायचा आहे. त्यानंतर काही क्षणांतच संबंधीत एक्स्प्रेसचं स्टेटस तुमच्यावर व्हॉट्सअॅप येईल.    हेही वाचा

आता ऑनलाईन तिकीट महाग!
संबंधित विषय