आता एसी लोकलचं तिकीटही मिळणार मोबाईलवर!

बहुप्रतिक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. त्यानंतर, या एसी लोकलच्या तिकीटांवरुन प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. पण, आता हा संभ्रम थोडा तरी कमी व्हावा, यासाठी एसी लोकलचं तिकीट आता मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

म्हणजेच, यूटीएस या अॅपवरच एसी लोकलचं तिकीट उपलब्ध होणार आहे. शिवाय, यासाठी नॉर्मल लोकलच्या तिकीटासाठी उभं देखील राहण्याची गरज नाही. फक्त तुम्ही जिथे आहात तिथून तुमचं तिकीट मोबाईलवर बुक केलं की स्टेशनवर जाऊन ते तुम्हाला घेता येणार आहे.

एसी लोकलच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकीटावरुन नाराजी व्यक्त करत फर्स्ट क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तरी एसी लोकलने प्रवास करु द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार, लवकरच फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक

पुढील बातमी
इतर बातम्या