Advertisement

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक


मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक
SHARES

ख्रिसमस गिफ्ट म्हणून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या भारतातील पहिल्यावहिल्या एसी लोकलमध्ये बसण्याचे वेध आता प्रवाशांना लागलेत. पण या लोकलचं भाडं नेमकं किती असेल, यावर अद्याप प्रवाशांमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. पण, टेन्शन नाॅट. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध करून दिलेलं वेळापत्रक आणि दर पत्रकावर नजर टाकल्यास हा गोंधळ नक्कीच दूर होईल.


'असा' झाला गोंधळ

एसी लोकलचं उद्घाटन झाल्याबरोबर प्रवाशांनी गारेगार प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी
नियमीत पास किंवा तिकीट असूनही एसी लोकलचं वेगळं तिकीट घेऊन प्रवास केला. तर बहुतांश प्रवाशांना एसी लोकलचं नेमकं भाडं किती आहे, याचा अंदाज नसल्याने एसी ट्रेनमध्ये चढून ते पुन्हा पुढच्या स्टेशनवर उतरले.


पहिल्या टप्प्यात बोरीवली ते चर्चगेट या मार्गावरच ही एकमेव एसी लोकल धावणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत या लोकलच्या दिवसभरात केवळ ६ फेऱ्या होतील.


एसी लोकलचं २९ डिसेंबरपर्यंतच वेळापत्रक (सोमवार ते शुक्रवार)

स्थानक
वेळ
चर्चगेट ते बोरिवली
स. ९. ३० वा.
चर्चगेट ते बोरिवली
स. ११. १५ वा.
चर्चगेट ते बोरिवली
दु. १. १६ वा.
बोरिवली ते चर्चगेट
स. १०. ३० वा.
बोरिवली चे चर्चगेट
दु. १२. २५ वा.
बोरिवली ते चर्चगेट
दु. २. ११ वा.


एसी लोकलमुळे प्रवाशांची उकाड्यापासून सुटका होईल. पण कदाचित तुमच्या खिशाला घाम येऊ शकेल.


दरपत्रक यानुसार

स्थानक
एकेरी प्रवास
साप्ताहिक
मासिक
चर्चगेट ते दादर
८५ रुपये
४४५ रुपये
८२० रुपये
चर्चगेट ते वांद्रे
८५ रुपये
४४५ रुपये
८२० रुपये
चर्चगेट ते अंधेरी
१२५ रुपये
६५५ रुपये
१२४० रुपये
चर्चगेट ते बोरिवली
१६५ रुपये
८५५ रुपये
१६४० रुपये
चर्चगेट ते विरार
२०५ रुपये
१०७० रुपये
२०४० रुपये

 

या एसी लोकलचं पहिल्या ६ महिन्यांसाठी जीएसटीसह किमान तिकीट ६० रुपये असणार आहे. तर, कमाल भाडं २०५ रुपये राहणार आहे. तसंच, या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध राहणार आहे.

सध्या पश्चिम मार्गावर एसीच्या १२ लोकल धावणार आहेत. यातील ८ लोकल विरार ते चर्चगेट या मार्गावर फास्ट धावतील. तर, इतर ३ लोकल चर्चगेट ते बोरिवली या मार्गावर फास्ट धावतील. तर स्लो मार्गावर सध्या केवळ एक लोकल धावणार आहे. ती महालक्ष्मी ते चर्चगेट या मार्गावर धावेल. यामध्येही सामान्य लोकलप्रमाणे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी वेगळे डबे ठेवण्यात आले आहेत.



हेही वाचा-

पहिल्याच दिवशी एसी लोकलने कमावले ६२ हजार ७४६ रुपये

मुंबईकरांनो, 'जस्ट चिल'! एसी लोकल सेवेत रुजू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा