एसी लोकलची चाचणी मध्य रेल्वेवर

पश्चिम रेल्वे मार्गावरील दुसरी एसी लोकल चेन्नईतून विरार कारशेडमध्ये दाखल झाली आहे. मात्र या एसी लोकलची चाचणी पश्चिम रेल्वे मार्गावर न घेता मध्य रेल्वेमार्गावर घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावर येत्या काळात एसी लोकल चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळं घाट असलेल्या मार्गावर (कर्जत-कसारा) येणाऱ्या अडचणींना पडताळण्यासाठी मध्य रेल्वेवर ही चाचणी घेण्यात येणार आहे.

एप्रिलमध्ये सुरू

मध्य रेल्वे मार्गावर या एसी लोकलची चाचणी यशस्वी झाल्यास मार्चअखेरीस ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही एसी लोकल सुरु करण्यात येणार आहे.  या नव्या एसी गाडीची मोटार आणि बाकीची विद्युत उपकरणं लोकलखाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

म.रे.वर एसी लोकल?

२५ डिसेंबर २०१७ या दिवशी मुंबईत पहिली एसी लोकल धावली. या लोकलच्या विरार आणि चर्चगेट दरम्यान दिवसाला १२ फेऱ्या होतात. मुंबईत दाखल होणारी दुसरी एसी लोकल सुद्धा पश्चिम रेल्वेलाच मिळणार आहे. मात्र, मध्य रेल्वेवर एकही एसी लोकल धावत नसल्यानं मध्य रेल्वेवर या एसी लोकलची चाचणी करून सुरू करण्याचं नियोजन आहे. त्यामुळं येत्या काळात मध्य रेल्वे मार्गवार एसी लोकल धावणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

बेस्ट बसमध्येही होणार पुढील थांब्याची घोषणा

६ वर्षात लोकलमधून ९९ कोटींचे मोबाइल चोरीला


पुढील बातमी
इतर बातम्या