Advertisement

बेस्ट बसमध्येही होणार पुढील थांब्याची घोषणा

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलप्रमाणे आता पुढच्या स्थानकाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनानं बस गाड्यांमध्ये एलईडी डिस्ल्पे आणि स्पिकर लावले आहेत.

बेस्ट बसमध्येही होणार पुढील थांब्याची घोषणा
SHARES

 लोकलप्रमाणे आता बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढच्या थांब्याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनानं बस गाड्यांमध्ये एलईडी डिस्प्ले आणि स्पिकर लावले आहेत. ही सुविधा बेस्टच्या प्रवासी सुचना प्रणाली (PIS)चा एक भाग असून, बेस्टच्या २८०९ बस गाड्यांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. तसंच, बॅकवे - वडाळा बस डेपो या मार्गावर आणि पश्चिम उपनगरातील काही मार्गांवर या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.


आयटीएमएस प्रणाली

मार्च २०१८ मध्ये बेस्ट प्रशासनानं ११२ कोटी रुपयांच्या इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तसंच, नऊ महिन्यामध्ये ही प्रणाली बेस्टच्या बस गाड्यांमध्ये सुरु करण्यात येणार होती. परंतू, काही कारणामुळे आयटीएमएस प्रकल्पाला रखडत होता. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी ३४ कोटींची तरतूद केली असल्यानं या प्रकल्पाला गती मिळाली आहे. आयटीएमएस प्रणाली टप्प्याटप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. तसंच, बेस्टनं आयटीएसएस अंतर्गत प्रवाशांसाठी मोबाइल अॅप्लिकेशनची सुविधा देखील सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅप्लिकेशनमुळे बेस्टच्या प्रवाशांना बस थांब्यावर कधी येणार हे समजणं शक्य होणार आहे.



हेही वाचा -

शिक्षकांसाठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

डहाणू, तलासरीला पुन्हा भूकंपाचा धक्का, आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा