Advertisement

शिक्षकांसाठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्रात १० हजार ००१ इतक्या जागांची विविध शाळा, कॉलेजात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली.

शिक्षकांसाठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध
SHARES

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्रात १० हजार ००१ इतक्या जागांची विविध शाळा, कॉलेजात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली.


पवित्र पोर्टलला सुरूवात

गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ व कॉलेजांमध्ये अनेक पदं रिक्त असल्यानं अनेक ठिकाणी फक्त तासिका तत्वावर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. या सर्व कारणामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान लक्षात घेऊन थेट अध्यापक निवडणुकीपूर्वी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गुणवत्तेवर आधारित व पारदर्शक पद्धतीनं व्हावी या उद्देशानं शिक्षण विभागानं 'पवित्र' या वेबपोर्टलची सुरूवात करण्यात आली होती. यानुसार प्रत्येक उमेदवाराला शिक्षक भरतीसाठी नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 



या संवर्गातील जागा

या जाहिरातीनुसार अनुसूचित जाती - १ हजार ७०४, अनुसूचित जमाती -२ हजार १४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा भरतीत समावेश असणार आहे. 


शनिवारपासून जाहिरात प्रसिद्ध

सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना ही  शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणार असून येत्या शनिवारी २ मार्चपासून विविध स्थानिक वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसंच शनिवारपासून शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाही पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या शाळांबाहेर जंकफूड विक्रीस बंदी

शिक्षकांचे आंदोलन मागे, निकाल वेळेतच लागणार





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा