Advertisement

डहाणू, तलासरीला पुन्हा भूकंपाचा धक्का, आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप

नोव्हेंबर महिन्यापासून पालघरला एकापोठापाठ एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. १ फेब्रुवारी रोजी डहाणू, तलासरी तालुक्यात एकापोठापाठ १६ भूकंपाचे धक्के बसले. यातील ६ भूकंप ३ रिश्टर स्केलचे होते.

डहाणू, तलासरीला पुन्हा भूकंपाचा धक्का, आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप
SHARES

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.  या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. पालघरमध्ये आतापर्यंत बसलेला हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप आहे. या भूकंपाचा धक्का ठाण्यात तसंच गुजरातमधील उंबरगाव, सिल्वसा, वापी या ठिकाणीही बसला आहे. 


घरांना मोठे तडे

शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमाऱ्यास झालेल्या या भूकंपामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील काही घरांना मोठे तडे गेले आहेत. या भूकंपामुळे रेल्वे रुळांना तडे गेले आहेत किंवा काय याची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारपासून दहावीची परिक्षा सुरू झाली असून भूकंपामुळे विद्यार्थी भयभयीत झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून भूकंपाचे पाच ते सहा धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे. 


१६ भूकंपाचे धक्के 

नोव्हेंबर महिन्यापासून पालघरला एकापोठापाठ एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. १ फेब्रुवारी रोजी डहाणू, तलासरी तालुक्यात एकापोठापाठ १६ भूकंपाचे धक्के बसले. यातील ६ भूकंप ३ रिश्टर स्केलचे होते. तर यामधील ४.१ रिश्टर स्केलचा सर्वाधिक क्षमतेचा भूकंप होता. त्यानंतर आता एक महिन्यानंतर पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का डहाणू, तलासरीला बसला आहे. हा भूकंप ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा असून वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे नागरिक भयभयीत झाले आहेत. 



हेही वाचा - 

शिक्षकांसाठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

बेस्टच्या प्रश्नांवर शुक्रवारी 'आमची मुंबई,आमची बेस्ट'तर्फे जनसुनावणी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा