Advertisement

बेस्टच्या प्रश्नांवर शुक्रवारी 'आमची मुंबई,आमची बेस्ट'तर्फे जनसुनावणी


बेस्टच्या प्रश्नांवर शुक्रवारी 'आमची मुंबई,आमची बेस्ट'तर्फे जनसुनावणी
SHARES

मागील काही वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या खासगी गाड्यांमुळे कमी तिकीट दरात सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रम मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडत आहे. यातून बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी आणि बेस्ट उपक्रम सक्षम होण्यासाठी तसंच संबंधित प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी 'आमची मुंबई, आमची बेस्ट'तर्फे शुक्रवार १ मार्च रोजी जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघात ही सुनावणी होणार आहे.


अडचणींची वाढ

बेस्टचे दिवसेंदिवस घटणारे प्रवासी, बेस्टच्या अपुऱ्या सेवा, बसेसची कमी झालेली संख्या, बस फेऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे बेस्ट उपक्रमात अनेक अडचणींची वाढ झाली आहे. तसंच, मुंबई महापालिकेकडून बेस्टकरीता कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळं बेस्टच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी 'आमची मुंबई, आमची बेस्ट'तर्फे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

'आमची मुंबई, आमची बेस्ट'चे माजी न्या. हॉस्बेट सुरेश हे पॅनेलचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या पॅनेलमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, घर हक्क समिती कार्यकर्त्या झुबेदा सय्यद, टीआयएसएसचे (मुंबई) अर्थतज्ज्ञ आर. रामकुमार, आयआयटीचे (मुंबई) डी. पार्थसारथी यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, पॅनेलकडून या जनसुनावणीत सहभागी झालेल्यांची मते जाणून घेतल्यानंतर काही दिवसाच त्याचा संपूर्ण अहवाल सादर केला जाणार आहे.



हेही वाचा -

शिक्षकांसाठी गुडन्यूज : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

हाय अलर्टमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा