ओळखपत्र नसतानाही काढता येणार बसपास

उपनगरी रेल्वेनंतर मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. वाढणारा तोटा आणि कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे बेस्ट प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार आता प्रवाशांना आरएफआयडी स्मार्टकार्ड नसतानाही दैनंदिन बसपास काढता येणार आहे. नुकतेच याबाबतचे आदेश बेस्ट प्रशासनानं दिले आहेत.

स्मार्टकार्डची गरज नाही

बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी स्मार्ट कार्डच्या मदतीनं पास देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेत दैनंदिन पास काढण्यासाठी प्रवाशांना आरएफआयडी स्मार्टकार्ड दाखवणं गरजेचं होतं. मात्र बहुतेक वेळा स्मार्टकार्ड हरवल्यानं किंवा विसरल्यानं प्रवाशांना पास काढता येत नव्हता. त्यामुळंच बेस्टनं आरएफआयडी स्मार्टकार्ड नसतानाही पास काढता येईल असा प्रस्ताव बैठकीत मान्य केला आहे. त्याशिवाय आता रविवार व सार्वजनिक सुट्टी सोडूऩ इतर दिवशीही बेस्ट बसमधून फिरायला जातानाही स्मार्टकार्डची गरज भासणार नाही. तसचं ज्यांच्याकडे आरएफआयडी स्मार्टकार्ड नसेल त्यांनाही या सुविधेचा लाभ आता घेता येणार आहे.

कुटुंबासाठी सोयिस्कर

बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी आरएफआयडी स्मार्टकार्डवर आधारित बसपास योजना आणली होती. या आरएफआयडी स्मार्टकार्डधारकालाच दैनंदिन बसपास, मासिक, त्रैमासिक मॅजिक बसपास तसंच किलोमीटरवर आधारित मासिक व त्रैमासिक बसपास काढता येत होता. मात्र एकत्र कुटुंब बेस्टनं प्रवास करत असल्यास सगळ्यांना आरएफआयडी स्मार्टकार्ड देणे बेस्टला शक्य होत नसल्यामुळे अशा प्रवाशांना बसपास सुविधेपासून वंचित रहावं लागत होतं.


हेही वाचा -

गुड न्यूज! 1 सप्टेंबरपासून मोनो पुन्हा ट्रॅकवर

एसटीचं आॅनलाईन तिकीट आरक्षण रात्री बंद


 

पुढील बातमी
इतर बातम्या