Advertisement

एसटीचं आॅनलाईन तिकीट आरक्षण रात्री बंद


एसटीचं आॅनलाईन तिकीट आरक्षण रात्री बंद
SHARES

प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेलं 24 तास ऑनलाईन तिकीट आरक्षण आता रात्रीच्या दरम्यान बंद केलं आहे. ‘तांत्रिक सक्षमीकरणासाठी यापुढे रोज रात्री ही यंत्रणा बंद करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.


म्हणून आरक्षण बंद

तिकीट खिडकीवरील लागलेल्या रांगेपासून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने २४ तास आॅनलाईन तिकीट आरक्षण सुरू केलं होतं. मात्र तांत्रिक सक्षमीकरणाठी रोज रात्री ११.३० ते १२.३० या कालावधीत आॅनलाईन तिकीट आरक्षण बंद असेल. 


दिवसभर आरक्षण सुरू

रात्री ११.३० ते १२.३०च्या दरम्यान संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेचं संस्करण करण्यात येते. त्यामुळे ही यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद करण्यात येणार असल्याचं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं. त्यामुळे या कालावधीमध्ये प्रवाशांना आगाऊ आरक्षण करता येणार नाही. तर दिवसभरात कोणत्याही वेळी प्रवासी ऑनलाईन बसचं आरक्षण करू शकतात, असंही एसटी महामंडळाने सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा