विमानतळ टर्मिनल T2 ला T1 शी जोडण्यासाठी बेस्टची एसी बस सेवा सुरू

(Representational Image)
(Representational Image)

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) मुंबई विमानतळ T2 ला T1 शी जोडण्यासाठी गुरुवार, ७ एप्रिलपासून २४ तास एसी बस सेवा सुरू करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन विमानतळांदरम्यान प्रवास करणारे या एसी बसेसमध्ये चढू शकतात. या बसच्या फेऱ्या २०-३० मिनिटांनी असतील.

बेस्टचे पीआरओ मनोज वराडे यांनी सांगितलं की, दोन टर्मिनल्समधील बसचे भाडे प्रति तिकीट ५० असेल असं स्पष्ट केले.

आठवडाभर तसंच चोवीस तास या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध असतील अशी नोंद करण्यात आली आहे. वराडे पुढे म्हणाले की, फ्लाईट बदलण्यासाठी विमानतळांवरून प्रवास करणार्‍यांना मोठ्या संख्येनं नागरिकांना याचा फायदा होईल.

दोन्ही टर्मिनल्सच्या बाहेर बेस्टचे बस थांबे आहेत. ते मुंबई आणि उपनगरातील इतर भागांमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मार्गांसाठी आहेत. या नवीन सेवेमुळे दोन्ही टर्मिनल एकमेकांना जोडले जातील, प्रवाशांना यापुढे दोन टर्मिनल दरम्यान प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

अशा अनेक घटना घडल्या आहेत की जेव्हा प्रवासी चुकीच्या टर्मिनलवर पोहोचले आणि नंतर ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी शोधण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. या नव्या सेवेमुळे दोन्ही टर्मिनल्समधील प्रवास सोईस्कर होणार आहे.


हेही वाचा

ओला, उबरकडून अटींच्या पालनाबाबत लक्ष ठेवा, हायकोर्टाचे आदेश

१५ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहा, हायकोर्टाचे एसटी कामगारांना अल्टिमेट

पुढील बातमी
इतर बातम्या