ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा

ग्रामीण महाराष्ट्रातील (maharashtra) सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी याआधीदेखील ऐन दिवाळीत जवळपास महिनाभर आंदोलन केलं होतं. त्यांच्या संपामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा (maharashtra) तालुका आणि जिल्ह्यांशी थेट संपर्क तुटला होता.

आजही बहुसंख्य ठिकाणी एसटी (msrtc) ही वाहतुकीचं प्रमुख स्त्रोत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा आजही प्रवासाचं महत्त्वाचं साधन हे एसटी बस आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता तेव्हा अनेक गाव-खेड्यांमधील नागरीक हवालदिल झाली होती.

जिल्ह्यातून गावाला जाणं खूप खर्चिक झालं होतं. कारण खासगी वाहनांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. आता जर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्याचा मोठा फटका ग्रामीण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.

तसेच शहरातून दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनादेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असणार आहे.

ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employees) आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेने केला आहे.

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेकडून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील (mumbai) मध्यवर्ती कार्यालयात हे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. पण शासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वातील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ऐन दिवाळी आंदोलन होऊ शकतं. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करु नये यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा

खड्ड्यांवरून राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे खडेबोल

म्हाडाच्या AI चॅटबॉटचे लोकार्पण

पुढील बातमी
इतर बातम्या