मुंबई एन्ट्री पॉइंट्सवर पूर्ण टोल बंदी करणं कठीण - चंद्रकांत पाटील

अनेक ठिकाणी सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने छोट्या गाड्यांचा टोल बंद करत ४०० कोटी रुपये कंपन्यांना परतफेड म्हणून दिलं. पण मुंबई प्रवेशद्वारावर टोल बंद करण्यासाठी सरकारला अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई प्रवेशद्वारावर असलेल्या पाच ठिकाणी टोल बंद करण्याचा निर्णय अजून झालेला नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या संदर्भातील अहवाल राज्याच्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाच्या अभिप्रायनंतर निर्णय होण्याची शक्यता असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

नाथाभाऊंनी विचारला जाब

दरम्यान टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेवरून एकनाथ खडसेंनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने ज्या रस्त्यांवर टोल बंद केले आहेत, त्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप करत महसूलमंत्री चंद्रकात दादा पाटील यांना टोल फ्री महाराष्ट्र घोषणेबद्दल खडसेंनी जाब विचारला.

अजित पवारांची साथ

खडसेंनी जाब विचारताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी देखील त्यांना साथ दिली. पवार यांनी भाजपानं निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र टोल मुक्त करू, अशी घोषणा केली होती. पण मोठ्या वाहनांना टोल आकारला जातो. त्यामुळे तुमच्या घोषणांचे आता काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले चंद्रकात पाटील?

'राज्यातील ५३ टोल नाक्यांचा टोल बंद केला. फक्त मोठ्या वाहनांना टोल आकाराला जातो. यापुढे टोल फ्री महाराष्ट्र करण्याचा सरकारचा मानस आहे. याचबरोबर मोठ्या वाहनांना टोल न लावण्याचीही भूमिका असल्याचं' चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.  


हेही वाचा - 

राणे मंत्रिमंडळात आले, तरी चंद्रकांत पाटीलच दुसऱ्या क्रमांकाचे नेते

पुढील बातमी
इतर बातम्या