मध्य, पश्चिम रेल्वेने भंगारातून कमविले ८१० कोटी

मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, आता या दोन्ही रेल्वेनं भंगार विकून कोटींची कमाई केली. मध्य व पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत मिळून सुमारे ८१० कोटी जमा झाले आहेत.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दहा महिन्यांत रेल्वे परिसरातील भंगार विकून ५०० कोटी तर, मध्य रेल्वेने ३१० कोटी ४९ लाख रुपयांची कमाई केली. ‘शून्य भंगार’ मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यान जुने डबे, चाकं आदी ५०७ कोटींची भंगार विकण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत मध्य रेल्वेने भंगारातून ३१० कोटी ४९ लाख कमाई केली. याआधी रेल्वेनं लोकलं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईच्या माध्यमातून कोटींची कमाई केली.


हेही वाचा -

महिलेला डोळा मारायचा अधिकार कुणालाही नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं

PF चे व्याजदर घटले, 'हा' आहे नवीन दर


पुढील बातमी
इतर बातम्या