Advertisement

महिलेला डोळा मारायचा अधिकार कुणालाही नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं

महिला एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल, कुणालाही तिला हात लावण्याचा किंवा डोळे मारण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही, या शब्दांत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism minister aaditya thackeray) यांनी महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना सुनावलं.

महिलेला डोळा मारायचा अधिकार कुणालाही नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं
SHARES

महिला कितीही वर्षांची असो कितीही वाजता बाहेर गेली, कुठलेही कपडे घातले, काळोख असेल, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल, कुणालाही तिला हात लावण्याचा किंवा डोळे मारण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही, या शब्दांत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism minister aaditya thackeray) यांनी महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना सुनावलं. विधानसभेतील (vidhan sabha) महिलांविषयीच्या चर्चेत भाषण करताना ते बोलत होते. 

आदित्य ठाकरे (Tourism minister aaditya thackeray) आपल्या भाषणा म्हणाले, महिला दिनाच्या (women's day) पार्श्वभूमीवर सभागृहात महिलांच्या ( women safety) वेगवेगळ्या विषयांवर उपाययोजना केल्या जात आहेत. सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु माझी अशी इच्छा आहे की सभागृहात दर ३ महिन्यांनी महिला सबलीकरणावर चर्चा झाली पाहिजे. या चर्चेत महिलांसोबतच पुरूषांनाही बोलायची जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे.

हेही वाचा- होळी खेळा पण.., करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

महिला ही जननी आहे. ती आपली आई असते. पण जन्म झाल्यावर पहिल्यांदा आपल्याला हात लावते ती नर्स असते, शाळा-काॅलेजमधील शिक्षिका असते. महिलांकडून संस्कार मिळूनही एखाद्या पुरूषाला महिलांवर अत्याचार करण्याची बुद्धी कशी सुचते हा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे आपण एखादी महिला अत्याचाराची घटना घडल्यावर आरोपीला कडक शिक्षा कशी होईल, यावर चर्चा करतो, तशीच चर्चा एखाद्या व्यक्तीची अशी मानसिकताच तयार होऊ नये यावर करायला हवी. त्यासाठी शाळेत चौथीपासूनच मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यातील तफावत शिकवली पाहिजे. 

एखादी बलात्कार, लैंगिक शोषण, अॅसिड हल्ल्याची घटना घडल्यावर आपण महिलांनाच प्रश्न विचारतो की तू किती वाजता घराबाहेर पडली होतीस, तू कुठले कपडे घातले होते, तू काळोखात का गेलीस, तुझे कोणासोबत प्रेमसंबंध होते का? पण आपण पुरूषांना असे प्रश्न विचारत नाही, की तू असं कृत्य केलंसच का? आपला देश स्वतंत्र आहे. आणि या देशात कुठलीही महिला, कितीही वर्षांची असो कितीही वाजता बाहेर गेली, कुठलेही कपडे घातले, काळोख असेल, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल, कुणालाही तिला हात लावण्याचा किंवा डोळे मारण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही. 

महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले जातात. त्यांनी जवळ शिट्टी ठेवायला हवी, पेपर स्प्रे ठेवायला हवा, पण सोबत पुरूषांनाही महिलांकडे चांगल्या नजरेने बघण्याचे धडे दिले पाहिजेत. शाळेतील अभ्यासक्रमात लैंगिक समानतेचे धडे असले पाहिजेत. 

हेही वाचा- CAA वर महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मला या कमकुवत नाही, हे मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पंचतारांकीत हाॅटेलांमध्ये शेफ पुरूष असतात. तर ज्या जिल्ह्यात महिला पोलीस अधिकारी असतात तिथं गुन्हेगारांवर वचक असतो. आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत का? मी साडी घातली आहे का? असं अनेकदा वक्तव्य करतो. पण झाशीच्या राणीने हातात बांगड्या घालून लढाई लढली होती. घरातील स्त्री नोकरी करून कुटुंब सांभाळते. आज महिला शेतीपासून टुरिझमपर्यंत मेहनत घेताना दिसतात. तुम्ही निरिक्षण केलं तर जास्तीत जास्त शिव्या आई किंवा बहिणीच्या नावाने असतात, हे कळेल. त्यासाठी तुम्ही कितीही कठोर शिक्षा करा जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत गुन्हे घडतच राहतील. तेव्हा महिलांचा आदर व्हायला हवा, असं माझं मत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा