रेल्वेचे प्रवासी आता लोकल ट्रेनचे थेट लोकेशन ट्रॅक करू शकतात

लोकल प्रवाशांना बुधवार म्हणजेच आजपासून त्यांच्या लोकल ट्रेन्सचे थेट लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. यात्री अॅपच्या मदतीने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स आणि उरण लाईन ट्रेन साठी लोकल ट्रेनचे लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग हे या अॅपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

यासाठी रेकमध्ये जीपीएस उपकरणे बसवण्यात आली आहेत आणि लोकल ट्रेनचे रिअल-टाइम लोकेशन मिळवण्यासाठी अल्गोरिदमही विकसित करण्यात आला आहे.

प्रवासी नकाशावर ट्रेनचे लाइव्ह लोकेशन पाहू शकतात. डेटा दर 15 सेकंदांनी रिफ्रेश होतो आणि वापरकर्ते ट्रेनचे थेट लोकेशन मिळविण्यासाठी रीफ्रेश बटणावर क्लिक देखील करू शकतात.

एका वरिष्ठ सीआर अधिकाऱ्याने सांगितले, "मुंबई लोकलच्या प्रवाशांना सुधारित सेवा देण्यासाठी यात्री अॅपमध्ये सतत सुधारणा केली जात आहे."

लोकलवरील जीपीएस ट्रॅक करत लोकलची अद्यावत माहिती पुरवणारे यात्री मोबाइल अद्यावत अॅपचे लोकार्पण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ७ वर लोकार्पण कार्यक्रम आज बुधवारी पार पडला.

उपनगरी लोकल गाड्या वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दोन वर्षांपूर्वी यात्री अॅप विकसित करण्यात आले होते. या अॅपवर फक्त मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक दिसत होते. लोकल गाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा सुरु झाली नव्हती.

धवारी ही सुविधा यात देण्यात आली. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल ट्रेनमध्ये जीपीएस डिव्हाइस बसविण्यात आले आहे. मार्च २०२२ मध्ये बेलापूर-खारकोपर विभागात लोकल ट्रेनमधील लावलेल्या जीपीएस डिव्हाइस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. यात्री अॅपचे प्रात्यक्षिक करून बघणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

यात्री अपचे वैशिष्ट्ये

  • लोकल गाड्यांचे रियल टाईम स्टेटस कळणार
  • रेल्वे तिकीट, मासिक, त्रैमासिक पास यांचे दरपत्रक.
  • स्थानकांवरील सुविधा
  • पार्सल सुविधेचा तपशील.
  • आपत्कालीन संपर्क क्रमांक.
  • रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा.
  • मेगाब्लॉकचा तपशील


हेही वाचा

Ganpati 2022: गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण स्पेशल ट्रेन, जाणून घ्या सर्व माहिती

पुढील बातमी
इतर बातम्या