Advertisement

Ganpati 2022: गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण स्पेशल ट्रेन, जाणून घ्या सर्व माहिती

यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रथमच मेमू गाडीही सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेने घेतला आहे.

Ganpati 2022: गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण स्पेशल ट्रेन, जाणून घ्या सर्व माहिती
SHARES

यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रथमच मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) गाडीही सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याच्या एकूण ३२ फेऱ्या होणार असून रोहा-चिपळूणदरम्यान १९ ऑगस्टपासून चालवण्यात येतील. प्रवाशांचा चिपळूणपर्यंत अवघ्या ९० रुपयांत प्रवास होणार आहे. मेमू गाड्यांच्या ३२ फेऱ्या होतील.

गाडी क्रमांक ०११५७

रोहा येथून १९ ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि १० ते १२ सप्टेंबरला सकाळी ११.०५ वाजता सुटेल. चिपळूण येथे दुपारी १.२० वाजता गाडी पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५८

१९ ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि १० ते १२ सप्टेंबर या तारखांना चिपळूण स्थानकातून दुपारी १.४५ वाजता सुटणार आहे. रोहा येथे सायंकाळी ४.१० वाजता पोहोचेल.

आठ डब्यांची मेमू माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबेल. या गाडीच्या एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी आतापर्यंत एकूण १९८ विशेष फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

तिकीट खिडक्या आणि रेल्वेच्या मोबाइल तिकीट अ‍ॅपवरून या गाडीचे तिकीट काढता येणार आहे. मेमू गाडय़ांचा सरासरी वेग प्रति तास ५० किलोमीटर आणि जास्तीत जास्त १०० किलोमीटपर्यंत असतो. ही गाडी डिझेल आणि विद्युत अशा दोन्हीवर धावणारी असते.

हे आहे मेमूचे भाडे

  • रोहा ते माणगाव- ४५ रुपये
  • रोहा ते वीर- ५५ रुपये
  • रोहा ते करंजाडी- ६५ रुपये
  • रोहा ते विन्हेरे- ६५ रुपये
  • रोहा ते खेड- ८० रुपये
  • रोहा ते चिपळूण- ९० रुपये



हेही वाचा

Ganpati 2022: कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त 32 स्पेशल गाड्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा